अवघ्या एक फूट उंचीचा फ्रीज! लवकरच बाजारात होणार दाखल

एक फूट उंचीचं फ्रीज... गंमत वाटली ना! पण, हीच अशक्य गोष्ट शक्य करून दाखवलीय तीन विद्यार्थ्यांनी... आणि त्यांचा हा यशस्वी प्रयत्न लवकरच 'प्रोडक्ट'च्या रुपात मार्केटमध्ये दाखलही होणार आहे. 

Updated: Sep 1, 2015, 03:48 PM IST
अवघ्या एक फूट उंचीचा फ्रीज! लवकरच बाजारात होणार दाखल title=
सौ. डीएनए

मुंबई : एक फूट उंचीचं फ्रीज... गंमत वाटली ना! पण, हीच अशक्य गोष्ट शक्य करून दाखवलीय तीन विद्यार्थ्यांनी... आणि त्यांचा हा यशस्वी प्रयत्न लवकरच 'प्रोडक्ट'च्या रुपात मार्केटमध्ये दाखलही होणार आहे. 

नितेश मौर्या (१८ वर्ष), अमोद पाशवान (२० वर्ष) आणि समाद सिद्दीकी (१९ वर्ष) हे तीन विद्यार्थी एका खाजगी इन्स्टिट्यूटमध्ये 'एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन इंजिनिअरिंग - डिप्लोमा' करत आहेत.  

आणखी वाचा - एक लीटर पेट्रोलमध्ये १०० किलोमीटर धावणार ही भारतीय कार

काही दिवसांपूर्वी यांच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली आणि मग काय लागले तिघेही कामाला... अवघ्या महिन्याभरात त्यांनी एक फूट उंचीचा एक फ्रीज बनवलाय. दिवसाचे ८-१० तास त्यांनी आपलं हे स्वप्न साकार करण्यासाठी खर्ची घातले.

दररोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंपैंकी आम्हाला काहीतरी बनवायचं होतं. आम्ही बनवलेल्या फ्रीजसाठी खूपच कमी वीज खर्च होते. जर तुम्ही एका महिन्यात दररोज १२ तासही हे फ्रीज सुरू ठेवलं तरी तुमचं वीजेचं बील जास्तीत जास्त ३०० रुपये येईल, असं या विद्यार्थ्यांनी म्हटलंय. 

आणखी वाचा - पुढील वर्षी महिलांसाठी ट्विटरमध्ये नोकरीची संधी

महत्त्वाचं म्हणजे, एवघ्या एक फूट उंचीच्या या फ्रीजची किंमत आहे फक्त ४,५०० रुपये...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.