मुंबई शेअर बाजारात कामकाज ठप्प

मुंबई शेअर बाजारात कामकाज ठप्प झालंय. तांत्रिक बिघाडामुळं मागील 1 तासापासून सर्व व्यवहार बंद झालेत.

Reuters | Updated: Jul 3, 2014, 11:24 AM IST
मुंबई शेअर बाजारात कामकाज ठप्प title=
फाईल फोटो

मुंबई: मुंबई शेअर बाजारात कामकाज ठप्प झालंय. तांत्रिक बिघाडामुळं मागील 1 तासापासून सर्व व्यवहार बंद झालेत.

सकाळी शेअर मार्केट उघडलं तेव्हा बाजारातील व्यवहार सुरळीत सुरू होते. मात्र साधारपणे 9.27 मिनिटांनी काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळं काही वेळातच बाजारातले सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.

तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र या बिघाडामुळं आर्थिक नुकसानीची शक्यता निर्माण झाली आहे. अशा पद्धतीनं व्यवहार बंद राहण्याची ही कदाचित पहिलीच घटना आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.