भाजप विधानसभा निवडणूक गडकरींच्या नेतृत्वात लढवणार?

राज्याच्या विधानसभा निवडणुकांची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केलीय. मुंबईत आज भाजप विस्तारित कार्यकारणीची बैठक होतेय. विशेष म्हणजे ही निवडणूक केंद्रीय दळणवळण मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात होण्याची शक्यता आहे. तसे संकेतच आज होणाऱ्या बैठकीच्या बॅनरमधून दिसतायेत. कारण पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंहाच्या फोटोनंतर बॅनरवर नितीन गडकरींचा फोटो झळकतोय.

Updated: Jul 3, 2014, 11:04 AM IST
भाजप विधानसभा निवडणूक गडकरींच्या नेतृत्वात लढवणार? title=
शहाजी राजे क्रीडा संकुल, अंधेरी

मुंबई: राज्याच्या विधानसभा निवडणुकांची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केलीय. मुंबईत आज भाजप विस्तारित कार्यकारणीची बैठक होतेय. विशेष म्हणजे ही निवडणूक केंद्रीय दळणवळण मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात होण्याची शक्यता आहे. तसे संकेतच आज होणाऱ्या बैठकीच्या बॅनरमधून दिसतायेत. कारण पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंहाच्या फोटोनंतर बॅनरवर नितीन गडकरींचा फोटो झळकतोय.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपची विस्तारित कार्यकारणीची पहिली बैठक आज अंधेरी इथल्या शहाजी राजे क्रीडा संकुल इथं होत आहे. पक्षाचे राज्याचे पदाधिकारी, खासदार, आमदार, केंद्रातले खासदार मंत्री, जिल्हा आणि तालुका स्तरीय पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. 

विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराचा कार्यक्रम आणि तयारी यासंदर्भात ठोस कार्यक्रम दिला जाणार आहे. जिल्हा निहाय आढावा घेतल्यावर अनेक जिल्ह्यातून स्वतंत्र लढण्याची मागणी केली जात आहे. आता शिवसेनेबरोबर युती नको अशी भावना अनेक पदाधिकारी यानी व्यक्त केली आहे. तेव्हा आजच्या बैठकीत पक्षाचे वरिष्ठ नेते 
कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात, संदेश देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.