मुंबई : तुम्हाला औषधं हवी असतील तरी ती आजच खरेदी करा. कारण ऑनलाईन औषध विक्रीविरोधात देशभरातील जवळपास ८ लाख विक्रेत्यांनी उद्या देशव्यापी संप पुकरलाय. यात राज्यातील संघटनाही सहभागी होणार आहेत.
दरम्यान, परिस्थिती हाताळण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं पावलं उचलली आहेत. जर रुग्णांना औषधं मिळाली नाही तर कारवाईचा इशारा देण्यात आलाय.
सुरक्षेच्या कारणास्तव औषध विक्रेत्यांनी ऑनलाईला विक्रीला हरकत घेतली असली तरी ८० हजार कोटी रुपयांच्या औषध विक्रीच्या बाजारपेठेत गेल्या दोन वर्षात ऑनलाईन विक्रेत्यांचा सहभाग वाढल्याची चिंता विक्रेत्यांना आहे. उद्या दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टनं जाहीर केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.