मुंबई : जीएसटी लागू झाल्यानंतर मेट्रो आणि लोकल ट्रेनची सेवा करमुक्त होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लोकलच्या पासचे गणित केल्यावर लोकलच्या पासवर साधारणतः ४.३० टक्के सध्या सेवा कर लागतो. तर हा सेवा कर पूर्णपणे रद्द होणार आहे. त्यामुळे आता हा प्रवास स्वस्त होणार आहे....
आपण हे समजून घेण्यासाठी डोंबिवली ते भायखळा लोकलच्या तीन महिन्याच्या पासचे उदाहरण घेऊ या.... डोंबिवली ते भायखळा या फर्स्ट क्लासच्या प्रवासासाठी सध्या २४५० रुपये लागतात. यावर ४.३० टक्क्यांनी सेवा कर लक्षात घेता एकूण १०५ रूपये कर लागत होता. पण आता २४५० रुपयांतून १०५ रुपये वजा होऊन उरलेली रक्कम तुम्हांला द्यावी लागणार आहे. म्हणजे एकूण २३४५ रुपये द्यावे लागणार आहेत.
तुमच्या खिशातील पास काढा. त्यात सर्वात खाली तुमच्या नावाखाली एक ओळ असते. त्यात STax:Rs.105 असे लिहिले असेल. तर ती रक्कम आता तुमच्या पासच्या रक्कमेतून वजा करून तुम्हांला उर्वरित रक्कम भरावी लागणार आहे.