मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. कोणार्क एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. बदलापूर ते वांगणी दरम्यान एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Updated: Jul 14, 2016, 05:43 PM IST
मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत title=

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. कोणार्क एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. बदलापूर ते वांगणी दरम्यान एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

बुधवारी रात्री देखील मुंब्रा-कळवा दरम्यान रेल्वे ट्रॅकला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत स्लो लाईनवरील कल्याणकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. ऐन कामावरून परतण्याच्या वेळीच अशा प्रकारे मध्य रेल्वेच्या या वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मध्य रेल्वेवरील प्रवाशी नेहमीच्या या घटनांना कंटाळले आहेत.