मुंबई : पैशाच्या अफरातफरी प्रकरणी अटकेत असणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांची आज पुन्हा एकदा आर्थररोड तुरुंगात रवानगी करण्यात आली.
भुजबळ गेल्या 17 सप्टेंबरपासून जे.जे. रुग्णालयात उपचार घेत होते. सुरूवातीला डेंग्यूच्या संशयाने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. पण त्यांना डेंग्यू नसल्याचे चाचण्यामध्ये स्पष्ट झाले. पण त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयाद दाखल केले होते.
आता जवळपास 25 दिवसांच्या उपचारानंतर भुजबळांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना पुन्हा एकदा आर्थररोडमध्ये रवानगी करण्यात आली. दरम्यान, भुजबळ यांचा जामीन अर्ज 12 वेळा फेटाळण्यात आल्याने त्यांना जेलमध्येच काढावे लागत आहेत.