छगन भुजबळ यांच्या कोठडीत वाढ, पंकज यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट

छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलाय. त्याचवेळी छगन भुजबळ, समीर भुजबळ यांच्या कोठडीत वाढ करण्यात आलेय.

Updated: Apr 27, 2016, 04:36 PM IST
छगन भुजबळ यांच्या कोठडीत वाढ, पंकज यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट title=

मुंबई : छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलाय. त्याचवेळी छगन भुजबळ, समीर भुजबळ यांच्या कोठडीत वाढ करण्यात आलेय.

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉड्रिंग प्रकरणाच्या आरोपावरून अटकेत असलेल्या छगन भुजबळांना दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आता ११ मेपर्यंत वाढ करण्यात आलेय. त्यांना त्याआधी १३ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर २७ एप्रिल अशी वाढ केल्याने भुजबळांचा मुक्काम हा जेलमध्येच होता.

घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता छगन भुजबळांची कोठडी वाढवण्याची मागणी ईडीनं केली होती. पण भुजबळांची तब्येत बरी नसल्यानं त्यांना जामीन देण्यात यावा अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली. पण कोर्टानं ही मागणी फेटाळली, आणि त्यांची कोठडी वाढवली.  

अधिका-यांच्या स्पष्टीकरणानंतर ईडी न्यायालयाचं वॉरंट पंकज भुजबळ यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याने त्यांना आता अटक होणे अटळ आहे. त्याचवेळी छगन, समीर भुजबळांच्या कोठडीत वाढ करण्यात आलेय. तर या दोघांना ११ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेय.