छोटा राजनची सुरक्षा व्यवस्था कडक असेल : मुंबई पोलीस आयुक्त

डॉन छोटा राजनला भारतात आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला मुंबईत आणले जाईल. त्याच्या सुरक्षेसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. दोन ते तीन ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था केलेय, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

Updated: Nov 3, 2015, 09:19 PM IST
छोटा राजनची सुरक्षा व्यवस्था कडक असेल : मुंबई पोलीस आयुक्त title=

मुंबई : डॉन छोटा राजनला भारतात आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला मुंबईत आणले जाईल. त्याच्या सुरक्षेसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. दोन ते तीन ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था केलेय, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

अधिक वाचा - मी सरेंडर केलं नाही, भारतात परतायचंय- छोटा राजन

डॉन राजनला मुंबईत आणण्यात येणार असल्याने त्याच्या सुरक्षेच्या व्यवस्थेची सुरुवात केली आहे. दोन ते तीन जागा निश्चित केल्या आहेत. छोटा राजनला ठेवण्याकरिता सुरक्षा देण्यात येणार आहे. दरम्यान, पोलीस दलात दाऊदची माणसं आहेत याबाबत आयुक्तांनी बोलणे टाळले

आणखी वाचा - जाणून घ्या कशी झाली छोटा राजनला अटक

छोटा राजनवर ७० पेक्षा जास्त गुन्हे मुंबईत दाखल आहेत. काही गंभीर गुन्ह्यांबाबत छोटा राजनवर सर्वात आधी खटले चालवले जातील. सीबीआय ही केंद्र तपासाची यंत्रणा आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करुन मुंबई पोलीस छोटा राजनला ताब्यात घेईल, असे पोलीस आयुक्त म्हणालेत.

छोटा राजनने गुन्हे केलेत त्यावेळी असणाऱ्या मुंबई पोलीस अधिकाऱ्यांची तपास कामात मदत घेतली जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.