मुंबई : मुख्यमंत्र्यांनी आज अवयवदानाचा फॉर्म भरला. मुंबईत नरिमन पॉईंट येथे अवयवदानाविषयी जनजागृती कार्य़क्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी हा फॉर्म भरला. महारॅलीमध्ये नागरीक मोठया संख्येने सहभागी झाले आहेत.
स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडवणीस, दीपक सावंत आणि गिरीश महाजन यांनी अवयवदानाचे फॉर्म भरले. मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या महारॅलीला सुरुवात झाली.
किडनीदान प्रक्रियेसाठी एक सॉफ्ट वेअर तयार करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सांगितले.
किडनी रॅकेट आता उघड झाले आहे, या प्रकारे अनेक अवयवांचे रॅकेट सुरु आहे. अशी रॅकेट संपवायची असतील तर त्यावर एक उपाय म्हणजे अवयवदान असे रॅलीत सहभागी झालेल्या जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांनी सांगितले.