मुंबई : १९ आमदारांच्या निलंबनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच बोलले आहेत. विरोधी आमदारांचं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निलंबन झालेलं नाही. त्यांच्या अशोभनिय वर्तनामुळे गंभीर प्रश्नाला चुकीच्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
अर्थसंकल्प हा संविधानिक दस्तावेज आहे. तो जाळणं हा सभागृहाचा अपमान आहे. सभागृहाचा अवमान होत असताना, अर्थसंकल्प जाळत असताना कुठलीच कारवाई करू नये असं विरोधकांचं मत असेल तर तसं होणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणालेत.
विरोधकांनी कामकाजात सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो. आम्ही विरोधकांशी चर्चा करायला तयार आहोत. पण त्यांची तशी मानसिकता दिसत नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.