मुंबई : आज महाराष्ट्र दिन. भाषिक निकषानुसार स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचा आज ५५ वा वर्धापन दिन. या निमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी प्राण वेचणाऱ्या हुतात्म्यांच्या मुंबईतल्या हुतात्मा स्मारकावर सकाळी मुख्यमंत्र्यांनी पुष्पचक्र वाहिलं. राज्याच्या विकासासाठी आपण बांधील असल्याची ग्वाही देत, त्यासाठी झटण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.
१ मे हा महाराष्ट्र दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. परंतु हा दिवस का आणि कशासाठी साजरा केला जातो यासंदर्भात खूप कमी जणांना माहिती असते. काही जण हा सुट्टीचा दिवस म्हणून या दिवसाकडे पाहतात, याच पार्श्वभूमीवर रेनिसंस इन्स्टीट्युट ऑफ कोम्पिटेटिव्ह एक्झाम या संस्थेद्वारे गेले दोन दिवस ठिक ठिकाणी पथनाट्याद्वारे या दिवसाच महत्व पटवून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
या पथनाट्याद्वारे हे विध्यार्थी गल्लीबोळात जाऊन स्वातंत्र्याच्या रंसंग्रमावर आधारित पथनाट्य सदर करत आहेत . महाराष्ट्राच्या स्वतंत्र संग्रामाचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचावा हा उद्देश या माध्यमातून आम्ही सकारात आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी विध्यार्थ्यानी दिली.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने नागपूरच्या अस्मी बॅंड पथकाने एक गाणे तयार केले आहे. नागपूरच्याच सुबोध साठे या युवा गीतकार आणि संगीतकाराच्या पुढाकाराने हे गाणं तयार करण्यात आलंय
महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून लातूरचे प्रसिद्ध शाहीर संतोष साळुंके यांनी शाहीर आत्माराम पाटील लिखित 'महाराष्ट्राची यशोगाथा' हा पोवाडा खास झी २४ तासच्या दर्शकांसाठी गायिला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.