मुंबई : वाहनांच्या मागे लिहलेला 'हॉर्न ओके प्लीज' असं आता लिहिता येणार नाहीय. कारण हा मेसेज आता बेकायदेशीर ठरणार आहे. राज्याच्या परिवहन विभागाने याबाबतीत परिपत्रक जारी केले आहे.
मोठ्या शहरात, ट्रॅफिक जॅम असताना बाईक, रिक्षा, टॅक्सी, बस, कार चालक जागा मिळण्यासाठी हॉर्न वाजवतात. परंतु यामुळे पादचाऱ्यांना प्रचंड त्रास होतो.
शिवाय 'हॉर्न ओके प्लीज' असा संदेश वाहनांवर लिहून हॉर्न केव्हाही वाजवणं योग्य असल्याचा समज चालकांमध्ये होता. परंतु हा मेसेज अत्यंत चुकीचा असून नियमांचा भंग करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे.
अनेक वाहनांवर मागच्या बाजूला Horn OK Please असा संदेश लिहिलेला असतो, मात्र हा संदेश महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम १९८९ च्या नियम १३४ (१) मधील तरतुदींचा भंग करणारा आहे. म्हणून वाहनांवरील हा संदेश चालक तातडीने काढून टाकला जाईल, यावर संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं, असा आदेशही सरकारने दिला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.