कॉमेडी नाईट्सच्या पलकविरोधात तक्रार

कलर्स चॅनेलवरील प्रसिद्ध 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' या कॉमेडी शोमध्ये पलकची भूमिका करणाऱा अभिनेता किकू शारदाविरोधात तक्रार दाधल करण्यात आलीय. 

Updated: Jan 4, 2016, 10:15 AM IST
कॉमेडी नाईट्सच्या पलकविरोधात तक्रार title=

मुंबई : कलर्स चॅनेलवरील प्रसिद्ध 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' या कॉमेडी शोमध्ये पलकची भूमिका करणाऱा अभिनेता किकू शारदाविरोधात तक्रार दाधल करण्यात आलीय. 

धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला असून कलम २९५ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. २७ डिसेंबर रोजी दाखवण्यात आलेल्या एपिसोडमध्ये डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहिम यांची खिल्ली उडवल्याचं त्यांच्या समर्थकांनी म्हटलेय. 

मात्र शारदाने हा एपिसोड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ट्विटरवरुन याबाबतचं स्पष्टीकरण दिलंय. या शोमध्ये कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता असं तिनं ट्विटरवर म्हटलं.