काँग्रेसने केली पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा

काँग्रेसनं पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. 

Updated: Sep 22, 2016, 07:15 PM IST
काँग्रेसने केली पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा title=

मुंबई : काँग्रेसनं पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. 

अमरावती मतदारसंघासाठी संजय खोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 

अमरावती मतदारसंघात भाजपचे उमेदवार आणि गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याविरोधात संजय खोडकेंचं आव्हान असणार आहे. तर नाशिकमध्ये भाजपच्या डॉ, प्रशांत पाटील आणि सुधीर तांबे यांच्यात लढत रंगणार आहे.