काँग्रेसचे जिप सभापतींसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत

मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवगठबंधन बांधून प्रवेश केला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 8, 2017, 08:16 PM IST
काँग्रेसचे जिप सभापतींसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत title=

मुंबई : परभणी काँग्रेसचे जिल्हा परिषद सभापती प्रभाकर जैस्वाल यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय..मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवगठबंधन बांधून प्रवेश केला.

त्यांच्यासोबत तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण सर्कलमधील सरपंच आणि उपसरपंचांनीही शिवसेनेत प्रवेश केला..यावेळी परभणीचे आमदार राहुल पाटील, संपर्क प्रमुख सुभाष भोयर आणि जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांची उपस्थिती होती..