बांधकामांचं पाणी तोडा!

पावसानं ओढ दिल्यामुळं पाणीकपातीचं संकट अधिकच गडद होत चाललंय. पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही बांधकामांसाठी पाणीवापरावर बंदी घालण्याची शक्यता आहे.

Updated: Aug 28, 2015, 10:53 AM IST
बांधकामांचं पाणी तोडा! title=

मुंबई : पावसानं ओढ दिल्यामुळं पाणीकपातीचं संकट अधिकच गडद होत चाललंय. पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही बांधकामांसाठी पाणीवापरावर बंदी घालण्याची शक्यता आहे.

बांधकामांसाठी १०० टक्के पाणीकपातीची मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी आयुक्तांकडे केलीय.  बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी ज्या जलजोडण्या मुंबई महापालिकेने दिल्या आहेत, त्या तातडीनं खंडीत केल्या जाव्यात अशी मागणी फणसेंनी आयुक्तांकडे केली आहे.

त्यामुळे  गृहप्रकल्प रखडण्याची शक्यता असून घरांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईत निवासी, औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्रात २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आलीय. तर, मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होणाऱ्या व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रांना ५० टक्के पाणीकपात लागू करण्यात आलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.