मुंबई : वार्डांच्या पुनर्रचनेमुळे अनेक वॉर्ड गायब होण्याची शक्यता असून काही नवीन वॉर्ड निर्माण होणार असल्याने नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढलीय.
राज्यातल्या महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय.
मुंबई महापालिकेची प्रभाग रचना, आरक्षण सोडत आणि इतर सुनावणीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मुंबईत वॉर्ड रचना बदलण्याची आणि कमी होण्याची दाट शक्यता आहे, कारण मुंबई शहरात ३ टक्के लोकसंख्या कमी झाल्याचं सांगण्यात येतंय.
पुढल्या वर्षी म्हणजेच 2017 च्या फेब्रुवारीत निवडणूक अपेक्षित आहे. त्यासाठी प्रभाग रचना आणि आरक्षणासंदर्भातली कार्यवाही 9 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
तर 22 नोव्हेंबरला प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना काढली जाणार आहे. मुंबई महापालिकेसारखाच राज्यातल्या इतर नऊ महापालिकांच्या निवडणूक कार्यक्रमाचं वेळापत्रक असण्य़ाची शक्यता आहे.
मुंबईत वॉर्डच्या पुनर्रचनेमुळं अनेक वॉर्ड गायब होण्याची शक्यता आहे. तसंच काही नवीन वॉर्डंस निर्माण होणार असल्यानं विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांची धाकधूक वाढलीय.