काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, कामत-निरुपम यांचे कार्यकर्ते भिडलेत

काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. ज्येष्ठ नेते गुरुदास कामत आणि काँग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरुपम कार्यकर्ते भिडलेत. त्यामुळे काँग्रेसमधील खदखद पुन्हा एकदा पुढे आलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 2, 2017, 05:59 PM IST
काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, कामत-निरुपम यांचे कार्यकर्ते भिडलेत title=

मुंबई : काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. ज्येष्ठ नेते गुरुदास कामत आणि काँग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरुपम कार्यकर्ते भिडलेत. त्यामुळे काँग्रेसमधील खदखद पुन्हा एकदा पुढे आलेय.

काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी सकाळपासून ज्येष्ठ नेते भुपेंद्र हुड्डा यांच्या अध्यक्षतेखाली जुहू येथील हॉटेलमध्ये गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांच्या समवेत बैठक सुरु होती. कामत यांनी निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीत काँग्रेसपुढे पेच निर्माण झाला होता. कामत यांची नाराजी व्यक्त करण्यासाठी भुपेंद्र हुड्डा मुंबईत दाखल झाले. मात्र, कार्यकर्त्यांमधील वाद उफाळला.

भुपेंद्र हुड्डा यांच्या अध्यक्षतेखाली कामत-निरुपम यांच्यात बैठक सुरु होती. यावेळी कामत आणि निरुपम गटातील कार्यकर्ते एकमेकांत भिडले. अद्यापही काँग्रेसमधला अंतर्गत कलह शमताना दिसत नाही. काँग्रेसमध्ये शाब्दीक बाचाबाची झाल्याचे दिसून आले.