अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: मुंबईतील मरीन ड्राईव्हवर आज एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं. एरवी विनाहेल्मेट गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या दोन पोलिसांची पावती आज परिवहन मंत्र्यांनीच फाडली.
परिवहन मंत्री दिवाकर रावते मरीन ड्राईव्ह परिसरातून जात असतांना दोन महिला पोलीस कॉन्स्टेबल हेल्मेटशिवाय गाडी चालवत असल्याचं त्यांना दिसलं. त्यांनी तात्काळ गाडी थांबवत त्यांना खडसावलं आणि विनाहेल्मेट गाडी चालवत असल्यानं त्यांच्याकडून दंडही वसूल केला.
जर आपणच नियम पाळले नाहीत, तर लोकांचं काय? असा सवाल विचारत रावतेंनी दोन्ही कॉन्स्टेबलना समज दिली. ही आश्चर्यकारक आणि सामान्यांसाठी तितकीच दिलासादायक घटना अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.