मी देखील पाच पिढ्यांचा शेतकरी : सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत निवेदनासाठी उभे राहिले आणि शेतीविषयी बोलायला लागले, तेव्हा अजितदादांनी 'शहरी' असं म्हणून त्यांना टोमणा मारला. कदाचित शहरात राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काय कळणार असं, अजित दादांना म्हणायचं असेल.

Updated: Jul 20, 2015, 06:58 PM IST
मी देखील पाच पिढ्यांचा शेतकरी : सीएम title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत निवेदनासाठी उभे राहिले आणि शेतीविषयी बोलायला लागले, तेव्हा अजितदादांनी 'शहरी' असं म्हणून त्यांना टोमणा मारला. कदाचित शहरात राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काय कळणार असं, अजित दादांना म्हणायचं असेल.

मुख्यमंत्री म्हणतात, गाईची धार काढून दाखवली असती पण....

यानंतर मुख्यमंत्री सभागृहात निवेदन करण्यासाठी उभे राहिले आणि अजित पवारांकडे पाहून म्हणाले, "दादांनी मला 'शहरी' म्हटलं आहे, मला शेतीतलं कळतं, कदाचित तुमच्या एवढं कळत नसेल, मात्र तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी देखील पाच पिढ्यांचा शेतकरी आहे, माझी ही ज़मीन आहे, सातबारा आहे, आजही तेथे धान पिकवतो, आणि जरा वजनाची अडचण येते खाली बसायला म्हणून, नाहीतर गाईच्या दुधाची धारही तुम्हाला काढून दाखवली असती", असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर सभागृहात टाळ्यांचा आवाज झाला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.