व्हिक्टोरीया हाऊस दुर्घटना : दोन कंपन्यांविरोधात गुन्हा

मुंबईतील वरळी इथल्या व्हिक्टोरीया हाऊस दुर्घटनेप्रकरणी दोन कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. JSW स्टील लिमिटेड आणि TCPL कंपनी विरोधात नामजोशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 4, 2012, 02:14 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईतील वरळी इथल्या व्हिक्टोरीया हाऊस दुर्घटनेप्रकरणी दोन कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. JSW स्टील लिमिटेड आणि TCPL कंपनी विरोधात नामजोशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्किटेक्ट,कॉन्ट्रक्टर आणि JSW कंपनीच्या IT अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल झालायं. कलम 338 अंतर्गत निष्काळजीपणामुळे गंभीर दुखापत आणि कलम 304 अंतर्गत निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा त्यांच्यावर ठेवण्यात आलायं. काल व्हिक्टोरिया हाऊस इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. तर, 6 जण जखमी झाले आहेत. अमृता शुक्ला आणि मनोज शुक्ला अशी मृतांची नावं आहेत.
कमला मिल कंपाऊंडमधल्या व्हिक्टोरिया हाऊस इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरु असताना दुस-या मजल्यावरचा स्लॅब कोसळला आणि ही दुर्घटना घडली. महापालिकेकडून दुरुस्तीसंदर्भात कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश गृहनिर्माणमंत्री सचिन अहिर यांनी दिले होते.