निवडणूक अधिकाऱ्याला धमकवल्याप्रकरणी मंत्री जानकर दोषी : राज्य निवडणूक आयोग

देसाईगंज नगरपालिका निवडणूक अधिकाऱ्यावर फोन करून दबाव टाकल्याप्रकरणी भाजप सरकारमधील मंत्री महादेव जानकर यांना राज्य निवडणूक आयोगाने दोषी धरले आहे.  

Updated: Dec 14, 2016, 07:24 PM IST
निवडणूक अधिकाऱ्याला धमकवल्याप्रकरणी मंत्री जानकर दोषी : राज्य निवडणूक आयोग title=

दीपक भातुसे/ मुंबई : देसाईगंज नगरपालिका निवडणूक अधिकाऱ्यावर फोन करून दबाव टाकल्याप्रकरणी भाजप सरकारमधील मंत्री महादेव जानकर यांना राज्य निवडणूक आयोगाने दोषी धरले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लिनचिट देऊनही ते आता अडचणीत आलेत. दरम्यान, विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मंत्रीपदाचा गैरवापर करून निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकण्याचा महादेव जानकरांचा प्रयत्न झाल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाने तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. चिन्ह किंवा अर्जाबाबत फोन करणे चुकीचे असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने त्यांना दोषी धरताना म्हटले आहे.

ताशेरे ओढताना पाहा काय म्हटलेय आयोगाने

- राज्य निवडणूक आयोगाचे मंत्री महादेव जानकर यांच्यावर गंभीर ताशेरे
- देसाईगंज नगरपालिका निवडणूक अधिका-यावर फोन करून दबाव टाकल्याप्रकरणी जानकरांना धरले दोषी
- जानकरांनी आपल्या कॅबिनेट मंत्रीपदाचा वापर निवडणूक अधिका-यावर दबाव आणण्यासाठी केल्याचे स्पष्ट होते
- याप्रकरणी योग्य कारवाई केली नाही तर आयोगाच्या निष्पक्षतेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते
- निवडणूक अधिका-याला फोन केल्याचे जानकरांनी खुलाशात मान्य केले आहे
- वृत्तवाहिन्यांनी आपले फोनवरील संभाषण विकृत स्वरुपात प्रसिद्ध केल्याचा जानकरांचा खुलासा निवडणूक आयोगाने केला अमान्य
- मंत्री असल्याचे सांगून जानकर यांनी निवडणूक अधिका-यावर दबाव टाकला
- एखाद्या उमेदवाराला विशिष्ट चिन्ह द्यावे आणि एखाद्या उमेदवाराचा अर्ज बाद करायला सांगने बेकायदेशी
- जनतेच्या हितासाठी निवडणूक अधिका-याला फोन केल्याचा जानकरांचा दावा चुकीचा
- सदर उमेदवारास कपबशी चिन्ह देण्याचा आग्रह जानकरांनी धरला होता, यात जनतेचे काय हित होणार, निवडणूक आयोगाचा सवाल
- जानकरांनी आणलेला दबाव भा.दं.सं. १६६ नुसार आणि भा.दं.सं. कलम १८६ नुसार गुन्हा ठरतो
- नगरपंचायत नगरी अधिनियम कलम २२ (६) नुसार हे कृत भ्रष्टाचार मार्गाचा अवलंब ठरतो