मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये इंजीनियरिंग पेपर घोटाळा उघड

मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये इंजीनियरिंग पेपर घोटाळा उघडकीस आलाय. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी भांडुपमध्ये काही लोकांना अटक केलीये. अटक करण्यात आलेल्यांमध्ये विद्यापीठाचे 4 कारकून, 3 शिपाई आणि एका सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे. 

Updated: May 21, 2016, 03:42 PM IST
मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये इंजीनियरिंग पेपर घोटाळा उघड title=

मुंबई : मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये इंजीनियरिंग पेपर घोटाळा उघडकीस आलाय. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी भांडुपमध्ये काही लोकांना अटक केलीये. अटक करण्यात आलेल्यांमध्ये विद्यापीठाचे 4 कारकून, 3 शिपाई आणि एका सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे. 

पोलिसांना मिळालेल्या टीपवरून भांडुप परिसरात एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्याकडे मुंबई विद्यापीठाचा इंजिनियरिंगचा एक सोडवलेला पेपर मिळाला. 

16 मे अशी या पेपरची तारीख होती. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची त्यांने नावं घेतली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 8 कर्मचाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून अशा 92 उत्तरपत्रिका हस्तगत करण्यात आल्यात.