एक्सक्लुझिव्ह : शीना डायरीत म्हणते, इंद्राणी आई नाही तर चेटकीण आहे!

इंद्राणी मुखर्जी आणि शीनाचे बायोलॉजिकल वडील सिद्धार्थ दास यांच्या लग्नाशिवाय आलेल्या संबंधांतून जन्म घेतलेल्या शीनाला एखाद्या सामान्य मुलांप्रमाणे आपल्या आई-वडिलांचं प्रेम कधीच मिळालं नाही, याची सल तिच्या मनात लहानपणापासूनच होती. 

Updated: Sep 3, 2015, 12:22 PM IST
एक्सक्लुझिव्ह : शीना डायरीत म्हणते, इंद्राणी आई नाही तर चेटकीण आहे! title=

मुंबई : २४ वर्षांची असताना शीनाची तिच्याच आईनं हत्या केल्याचं आता उघड झालंय. इंद्राणीनं पोलिसांसमोर आपला गुन्हाही कबूल केलाय. इंद्राणी मुखर्जी आणि शीनाचे बायोलॉजिकल वडील सिद्धार्थ दास यांच्या लग्नाशिवाय आलेल्या संबंधांतून जन्म घेतलेल्या शीनाला एखाद्या सामान्य मुलांप्रमाणे आपल्या आई-वडिलांचं प्रेम कधीच मिळालं नाही, याची सल तिच्या मनात लहानपणापासूनच होती. २००३ मध्ये दहावीला असल्यापासून आपल्या मनातील हीच सल प्रेमासाठी आतूरलेल्या शीनानं दहावीला असल्यापासून आपल्या डायरीत उतरवण्यास सुरुवात केली. आपल्या आई-वडिलांशी किंवा कुणाशीच न बोलता येणाऱ्या गोष्टी तिनं या डायरीत उतरवल्या.

अधिक वाचा : शीना बोरा हत्याकांड आत्तापर्यंत... 

शीनानं या डायरीत आपल्याला आपल्या आईबद्दल फारसं काही माहित नाही, असं म्हटलंय. आपल्या आईला आपली आठवण आहे किंवा नाही, असाही प्रश्न तिला पडलाय. पण, इंद्राणी माझी आई आहे त्यामुळे 'ती माझ्या हृदयाच्या एका कप्प्यात आहे' असंही तिनं लिहिलंय. इतकंच नाही तर शीनानं आपल्या आईबद्दल वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्यांचे कटिंग्सही जपून ठेवले होते. यामध्ये इंद्राणीनं आयएनएक्स मीडियाच्या नव्या चॅनलच्या लॉन्चिंगची बातमी आणि इंद्राणी जगातील पॉवरफूल स्त्रियांपैंकी एक बनलेलीय अशा काही बातम्यांचा समावेशही आहे. 

diary
शीनाची नोंद - ११ फेब्रुवारी २००३, सौ. डीएनए

आपल्या वाढदिवशी शीना लिहिते...
ओह! हॅपी बर्थडे टू मी! पण मी खूश नाहीए. मला आत्तापर्यंत आयुष्यात काहीही मिळालेलं नाहीए, असं दिसतंय. काहीच नाही! माझं भविष्यही अंधारातच दिसतंय. निराशेनं मला चहूबाजूंनी घेरलंय. हे खूप तिरस्कार करण्याजोगं आयुष्य आहे. मी माझ्या आईचा तिरस्कार करतेय, that bloody b***h. ती  आई नाहीच. ती चेटकीन आहे...'

'इंद्राणीच्या मृतात्म्याला नरकातही शांती न लाभो...'
इंद्राणी आणि पीटर मुखर्जी यांच्या लग्नाची बातमी जेव्हा शीनाला समजली तेव्हा ती म्हणते, 'आणि आत्ता तीनं त्या म्हाताऱ्याशी लग्न केलंय (पीटर मुखर्जी)... तीचं हे पाऊल आयता आणि काकांना (आजी - आजोबा) खूप प्रतिष्ठीत वाटतंय... असेलही, पण माझ्यासाठी नाही. मी तिचा तिरस्कार करतेय. तीच्या मनाला कधीही शांती लाभणार नाही... तिच्या मृतात्म्याला नरकातही शांती न लाभो, अशीच माझी इच्छा आहे.  माझ्या मनात खूप खदखदतंय, डोळ्यांत खूप ढगं साठलेत पण, कधी, कुठे आणि कुणासमोर' अशी आपल्या मनाची वेदना शीनानं शब्दांत उतरवलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.