मुंबई : ग्राहकांकडून झेंडूच्या फुलांना मोठी मागणी होत आहे. फुलांबरोबर सोन्याचं प्रतिक समजल्या जाण्या-या आपट्याच्या पानांचीही मोठी आवक झाली आहे.
उद्या साज-या होण्याऱ्या विजयादशमीच्या निमित्ताने शहरात जवळपासच्या ठिकाणांहून झेंडूची फुले विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. दादरचे फूल मार्केट गजबजलेले आहे.
यावेळी झेंडुचे उत्पादन नेहमीपेक्षा जास्त आल्याने बाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याचे व्यापारी सांगत आहे.
अनेक शेतकरी थेट माल बाजारात विकत असल्याने त्यांच्याकड़ील झेंडु ३० रूपये किलोने मिळत आहे. तर व्यापारी, फेरीवाले यांच्याकडे किलोचा दर जास्त असल्याचं दिसून येतयं.