महाराष्ट्राचा मुलगा... 'इसिस'कडून घेतली 'सुसाईड बॉम्बिंग'ची पदवी!

सीरिया आणि इतर भागांत प्रभावीपणे आपल्या दहशतवादी कारवायांना तडीस नेणाऱ्या 'इसिस'ची पाळंमूळं खोलवर रोवल्याचं समोर येतंय... यासाठी, तांत्रिक गोष्टी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं हाताळणाऱ्या आणि दहशतवादी कारवायांसाठी लागणाऱ्या तांत्रिक गोष्टी तयार करणाऱ्या उच्च शिक्षितांचीही यासाठी 'इसिस'ला गरज भासतेय... आणि अशा तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्यातही इसिसला यश मिळतंय, हे विशेष... यामध्ये, महाराष्ट्रातल्या एका तरुणाचाही समावेश आहे.

Updated: Nov 27, 2015, 01:18 PM IST
महाराष्ट्राचा मुलगा... 'इसिस'कडून घेतली 'सुसाईड बॉम्बिंग'ची पदवी! title=

मुंबई : सीरिया आणि इतर भागांत प्रभावीपणे आपल्या दहशतवादी कारवायांना तडीस नेणाऱ्या 'इसिस'ची पाळंमूळं खोलवर रोवल्याचं समोर येतंय... यासाठी, तांत्रिक गोष्टी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं हाताळणाऱ्या आणि दहशतवादी कारवायांसाठी लागणाऱ्या तांत्रिक गोष्टी तयार करणाऱ्या उच्च शिक्षितांचीही यासाठी 'इसिस'ला गरज भासतेय... आणि अशा तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्यातही इसिसला यश मिळतंय, हे विशेष... यामध्ये, महाराष्ट्रातल्या एका तरुणाचाही समावेश आहे.

अधिक वाचा - भारताच्याच 'कुपुत्रा'नं दिली भारताला धमकी - एनआयए

भारतात परतलेल्या आरिब फयाझ माजिद हा २३ वर्षीय तरुण 'इसिस'मधून प्रशिक्षण घेऊन नुकताच भारतात परतलाय. मे २०१४ मध्ये सीरियामध्ये गेलेला आरिबला भारतीय गुप्तचर संस्थेनं गेल्या नोव्हेंबर महिन्यात अटक केली होती. पनवेलमध्ये राहणाऱ्या  आरिबनं आपलं इंजिनिअरींग पूर्ण केलंय. या तरुणाशी 'इसिस'नं संपर्क केल्यानंतर आणि त्याच्या ब्रेन वॉशिंगनंतर त्याला 'सुसाईड बॉम्बर' बनण्याचं प्रशिक्षणही दिलं गेलं. 

इतकंच नाही तर, आपल्या 'मानवी बॉम्ब' म्हणून निरनिराळ्या ठिकाणी पाठवणाऱ्यांची एक यादीही बनवली गेली होती. या यादित आरिबचं नाव पहिल्या क्रमांकावर होतं. 

वेगवेगळ्या चॅनल्सच्या साहाय्यानं भारतामधून सीरियाला गेलेल्या आरिफनं आपल्या इंजिनिअरिंग स्कीलचा वापर स्वत:ला तीन वेळा उडवून देण्याचा प्रयत्नही केला होता, असं आरिबनं म्हटलंय. रक्काह नावाच्या भागात भूमिगत बंकर उभारण्यासाठीही आरिफनं काम केलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.