विलेपार्ल्यात २४ वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार

मुंबईत २४ वर्षाच्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुंबईतल्या विलेपार्लेत ही घटना घडली आहे.

Updated: Mar 14, 2013, 01:05 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईत २४ वर्षाच्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुंबईतल्या विलेपार्लेत ही घटना घडली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी चार नराधमांना अटक केली आहे. पीडित तरुणी बुधवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास तिच्या मित्रासोबत अंधेरीच्या साकिनाका परिसरातून विलेपार्लेतल्या त्याच्या घरी आली होती. घरात मित्रासोबत कोणीही नव्हते याचा फायदा घेऊन चारजण त्यांच्या घरात घुसले.
तरुणीच्या मित्राला मारहाण करुन त्याला बाथरुममध्ये कोंडले. त्यानंतर तरुणीवर सामूहिक अत्याचार करुन तरुण पळून गेले. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.