सल्लूने कोणाला धमकावले, चौकशीचे समन्स?

दबंग स्टार सलमान खान यांने धमकावल्याने त्याच्याविरोधात चौकशीचा फेरा वाढणार आहे. पोलिसांनी समन्य पाठविण्यासाठी हालचाली सुरू केल्यात. त्यामुळे सल्लू पुन्हा वादात सापडण्यातची शक्यता आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 14, 2013, 12:53 PM IST

www.24taas.com,मुंबई
दबंग स्टार सलमान खान यांने धमकावल्याने त्याच्याविरोधात चौकशीचा फेरा वाढणार आहे. पोलिसांनी समन्य पाठविण्यासाठी हालचाली सुरू केल्यात. त्यामुळे सल्लू पुन्हा वादात सापडण्यातची शक्यता आहे.
नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असलेला सलमानच्या नावावर आणखी एक नवे प्रकरण जमा झाले आहे. वांद्रे येथील मच्छिमारांना धमकावल्याप्रकरणी बुधवारी तक्रारदार आणि त्याच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवण्यात आलाय. त्यामुळे सलमान खान, वडील सलीम खान यांच्यासह अंगरक्षक यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

सलमान खानने २०११ मध्ये वांद्रे येथील चिंबई परिसरात बेले व्ह्यू आणि बेनार ही दोन कॉटेज खरेदी करून त्यासमोर कुंपण घातले होते. त्या घरातून समुद्र पाहण्यासाठी बोटी तसेच मासेमारीचे सामान उचलण्याबाबत सलमानच्या अंगरक्षकांनी धमकावल्याचे लॉरेन्स फाल्कन या वृद्धाचे म्हणणे आहे.
यासंदर्भात त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात येथे सप्टेंबर, २०११ आणि त्यानंतर गतवर्षी मे आणि डिसेंबरमध्ये तक्रार केली होती. गेल्या आठवड्यात फाल्कन यांनी अप्पर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली होती.