www.24taas.com, मुंबई
उद्यापासून सहा दिवस सरकारी बँका बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं ग्राहकांची चांगलीच अडचण होणार आहे. 18 ते 20 तारखेच्या दरम्यान सुट्टी तर 22 आणि 23 ऑगस्टला बँक कर्मचा-यांनी संप पुकारण्याचा इशारा दिलाय.
बँकिंग क्षेत्रातल्या प्रस्तावित सुधारणा, आणि खंडेलवाल पॅनलच्या शिफारशी आणि कामाच्या आऊटसोर्सिंगला विरोध दर्शवण्यासाठी कर्मचा-यांनी संपाचं हत्यार उपसलंय.
दरम्यान या प्रकरणी 21 ऑगस्टला सरकारशी चर्चा केली जाणार आहे. ती चर्चा फिस्कटल्यास संप पुकारण्याचा निर्णय ‘युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन्स’ या विविध कर्मचारी संघटनांच्या संघटनेनं घेतलाय.