कविता शर्मा, मुंबई : आम्ही आता आपल्यासमोर आणतोय, एक भीषण वास्तव. हिरवं विष.. यातून आम्ही मुंबईसह महाराष्ट्रातील भयानक स्थिती दाखवणार आहोत.
सामान्य माणसांना धक्का देणारा हा रिपोर्ट आहे. मुंबईतला भाजीपाला पिकतोय चक्क गटारींच्या पाण्यावर. विश्वास बसत नाहीयेना ? पण हे वास्तव आहे अगदी मुंबईतलं. ठाण्याच्या कळवा परिसरात शिवाजीनगर, कळवा, मुंबई शेतीचा परिसरात रेल्वेच्या २ एकर जमीनवर हे हिरव विष रुजत आहे.
इथं पोहचण्यापूर्वीच आम्हाला कल्पना होती की इथंही तसंच चित्र पाहायला मिळेल. मात्र त्यापेक्षाही विदारक आणि किळसवाणं दृश्य पाहायला मिळालं. ज्या परिसरात ही भाजीपाल्याची शेती केली जातेय त्या ठिकाणी दोन्ही रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला घाणीचं आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय.
बनारसचे रहिवासी अससलेले संजय पाल. इथे भाजीपाला पिकवतात. जेव्हा आम्ही संजय पाल यांना विचारलं की तुम्ही ही शेती करण्यासाठी पाणी कुठुन आणता? आम्हाला त्यांचं उत्तर अपेक्षेप्रमाणेच मिळालं. तुम्ही ते उत्तर ऐकलत तर तुम्हालाही धक्का बसेल.
यानंतर आम्हाला आणखी एक अंगाला शहारे आणणारं दृश्य पाहायला मिळालं. तलावाच्या विषारी आणि दूषित पाण्यात भाजीपाला धूतला जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.