मध्य रेल्वेच्या हँकॉक ब्रिज तोडकामाला सुरुवात, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉक

मध्य रेल्वेचा हँकॉक ब्रिज पाडण्याचं काम हाती घेण्यात आलाय. यामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाला आहे. 

Updated: Jan 10, 2016, 08:41 AM IST
 मध्य रेल्वेच्या हँकॉक ब्रिज तोडकामाला सुरुवात, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉक title=

मुंबई : मध्य रेल्वेचा हँकॉक ब्रिज पाडण्याचं काम हाती घेण्यात आलाय. यामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाला आहे. 

शनिवारी रात्री १२.२० पासून आज संध्याकाळी ६.२० पर्यंत हे काम सुरु राहणार आहे. हा भलामोठा ब्रिज तोडण्यासाठी युद्धपातवळीवर काम सुरु आहे. 

भल्यामोठ्या चार क्रेन्स आणि तीनशे कामगारांच्या मदतीनं, हे तोडकाम सुरु आहे. रेल्वे हा ब्रिज तोडणार आहे. आणि त्याचं बांधकाम मुंबई महानगपालिका करणार आहे. पुढल्या दोन वर्षांत हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे.

दरम्यान आज या कामामुळे मध्य रेल्वेवर धावणा-या १०० लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तर लांब पल्ल्याच्या ४२ एक्स्प्रेस गाड्याही रद्द केल्या गेल्या आहेत.