भुजबळांना मदत करणाऱ्या डॉ. लहानेंना कोर्टाचा दणका

डॉक्टर तात्या लहाने यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झालीय. पदाचा गैरवापर करुन छगन भुजबळ यांना मदत केल्याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने लहाने यांना नोटीस बजावली असून मुंबई उच्च न्यायालयांनी लहाने यांना या नोटीशीला चार आठवड्यांत उत्तर द्यायला सांगितलंय. त्यामुळे आता लहाने यांच्या अडचणीत वाढ झालीय.

Updated: Mar 31, 2017, 03:45 PM IST
भुजबळांना मदत करणाऱ्या डॉ. लहानेंना कोर्टाचा दणका title=

मुंबई : डॉक्टर तात्या लहाने यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झालीय. पदाचा गैरवापर करुन छगन भुजबळ यांना मदत केल्याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने लहाने यांना नोटीस बजावली असून मुंबई उच्च न्यायालयांनी लहाने यांना या नोटीशीला चार आठवड्यांत उत्तर द्यायला सांगितलंय. त्यामुळे आता लहाने यांच्या अडचणीत वाढ झालीय.

तब्बल ३५ पेक्षा जास्त दिवस छगन भुजबळ यांनी बॉम्बे हॉस्पीटलमध्ये मुक्काम केला होता... आणि हा मुक्काम जे जे चे डीन तात्याराव लहाने यांच्या आशिर्वादानेच भुजबळांनी केला होता, हे मुंबई सत्र न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. तसंच तात्याराव लहाने यांच्यावर काय करावी करावी? याबाबत मुंबई उच्च न्यायालय ठरवेल, असे आदेश विशेष ईडी न्यायालयाने दिले होते. त्याआधारे मुंबई उच्च न्यायालयाने लहाने यांना ही नोटीस बजावलीय.

तात्याराव लहाने यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्यायालयात तक्रार देखील केली होती. छगन भुजबळ हे आरामात राहतायत त्यांना अनेक राजकीय त्याच गुन्हेगाराचे मंडळी भेटायला येत आहेत, असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. विशेष म्हणजे जे जे हॉस्पिटलचे डीन तात्याराव लहाने यांच्या आशिर्वादाने जे जे हॉस्पिटलमधील कैदी वॉर्डमधून उपचार आणि वैद्यकीय चाचण्यांच्या बहाणे बाहेर काढले गेले होते, असा आरोप अंजली दमानिया यांनी तात्याराव लहाने यांच्यावर केला होता.

धक्कादायक म्हणजे, भुजबळांना जे जे मधून कोणाच्या सांगण्यावरून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते हा आता संशोधनाचा विषय ठरला होता... त्याचं उत्तर आता मिळालंय. तात्याराव लहाने यांनी याबाबत न्यायालयात आपले म्हणणे मांडताना हात वर केले होते... पण अंजली दमानिया यांनी हे सर्व तात्याराव लहाने यांच्या आशिर्वादानेच झाल्याचा आरोप केलाय होता. त्यामुळे तात्याराव लहाने राजकीय कैद्यांना अधिकाराबाहेर जाऊन मदत करतात का? असा प्रश्न निर्माण झाला होता. गेली महिनाभर अंजली दमानिया यांनी तात्याराव लहाने यांच्यावर केलेल्या याचिकेवर सुनावणी आज झाली. त्यावेळी न्यायालयाने तात्याराव लहाने यांना दोषी ठरवलंय. पण शिक्षा मात्र हायकोर्ट सुनावेल असे आदेशही न्यायालयाने दिले होते. त्यामुळे आता तात्याराव लहाने यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झालीय.