एटीएम क्लोनिंगपासून कशी घ्याल काळजी

एटीएममधून पैसे काढताय?...पण जरा जपून...कारण एटीएम होतयं क्लोनिंग...आम्ही सांगतो तुम्हाला कशी घ्यावी काळजी

Updated: Jun 15, 2013, 05:53 PM IST

एटीएममधून पैसे काढताय?...पण जरा जपून...कारण एटीएम होतयं क्लोनिंग...आम्ही सांगतो तुम्हाला कशी घ्यावी काळजी

कुलाबा परिसरातील एटीएम मशीनमधून एटीएम-डेबिट कार्डचे क्लोनिंग करून २९ जणांच्या खात्यातून तब्बल १३ लाख इतकी रक्कम काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एटीएम कार्डाचे क्लोनिंग करून ती रक्कम हडपण्यात आली आहे. एटीएम कार्डाचे क्लोनिंग म्हणजे नेमके काय? त्याची ही माहिती...
कसे ओळखाल क्लोनिंग
- ज्या ठिकाणी कार्ड टाकले जाते तो भाग मशीनपेक्षा काहिसा वर आलेला असतो.
- मशीनच्या इतर भागांपेक्षा या भागाचा रंग काहीसा वेगळा असल्यास ती ‘स्क्रीमर मशीन’ असू शकते.
- एटीएम मशीनमधून पैसे काढल्यावर कार्ड काहीसे वेगळे होते.
- कार्डचा काही भाग खरखरीत किंवा खडबडीत झाल्यासारखा वाटतो.
काय घ्याल काळजी
- कार्ड टाकण्याच्या ठिकाणी मशीनवर काही वेगळे आढळल्यास पैसे काढू नका.
- पिन क्रमांक टाकताना क्रमांकावर हात ठेवा जेणेकरून पिन कॅमेराबद्ध होणार नाही.
- पैसे काढल्यानंतर कार्डमध्ये वेगळेपण आढळल्यास बँकेशी संपर्क करा.
- सार्वजनिक तसेच गजबज असलेल्या ठिकाणच्या एटीएममधून पैसे काढा.

कार्ड स्वाईप करताय पण जरा जपून
- खरेदी केल्यावर डेबिट कार्ड स्वाईप केले जाते. हे कार्ड पहिल्याच वेळी नीट स्वाईप व्हायला हवे. तसेच एकापेक्षा दुसर्याक मशीनवर स्वाईप करायला देऊ नका.• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.