'इंजेक्शन सायको'चा चेहरा उघड, महिलांना करायचा टार्गेट

आंध्र प्रदेशच्या पश्चिमी गोदावरी जिल्ह्यात सध्या एका 'इंजेक्शन सायको'ची दहशत पसरली आहे. ज्यानं एका आठवड्यात ११ महिलांना आपली शिकार बनवलंय. सोमवारी हैदराबाद पोलिसांनी पीडित महिलेच्या चौकशीच्या आधारावर आरोपीचं स्केच तयार केलंय.

Updated: Sep 1, 2015, 08:57 AM IST
'इंजेक्शन सायको'चा चेहरा उघड, महिलांना करायचा टार्गेट title=

हैदराबाद: आंध्र प्रदेशच्या पश्चिमी गोदावरी जिल्ह्यात सध्या एका 'इंजेक्शन सायको'ची दहशत पसरली आहे. ज्यानं एका आठवड्यात ११ महिलांना आपली शिकार बनवलंय. सोमवारी हैदराबाद पोलिसांनी पीडित महिलेच्या चौकशीच्या आधारावर आरोपीचं स्केच तयार केलंय.

आणखी वाचा - मृत महिलेवर तीन दिवस उपचार, हॉस्पिटलचं गौडबंगाल उघड

फक्त महिला आणि तरुणींना आपलं सायको टार्गेट करायचा. चेहरा झाकून आणि बाईकवरून तो आपलं सावज शोधायचा. जशी कोणती महिला एकटी दिसली, तिला इंजेक्शन देऊन हल्ला करायचा.

यानंतर त्या महिलेला काही झालं नाही, तिला हॉस्पिटलमधून सुट्टीही मिळाली. घटनास्थळाहून पोलिसांनी सुई हस्तगत केली.

आणखी वाचा - व्हिडिओ: दिवसाढवळ्या तलवारीचे वार करून हत्या, विचलित करणारे दृश्य
 

संशयित आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी १ लाख रुपयांचं बक्षिस जाहीर केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.