पवईत आयआयटीच्या विद्यार्थ्याची हॉस्टेलमध्ये आत्महत्या

डिप्रेशनमध्ये असलेल्या इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्यानं हॉस्टेलमध्येच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पवईतील आयआयटी कॅम्पसमधील हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला.

Updated: May 3, 2015, 04:39 PM IST
पवईत आयआयटीच्या विद्यार्थ्याची हॉस्टेलमध्ये आत्महत्या title=

मुंबई: डिप्रेशनमध्ये असलेल्या इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्यानं हॉस्टेलमध्येच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पवईतील आयआयटी कॅम्पसमधील हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला.

केमिकल इंजीनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकणारा रितेश शर्मा यानं विष प्राशन करून आत्महत्या केलीय. त्याच्याजवळ एक सुसाईड नोटही सापडलंय. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. 

काल संध्याकाळी ही घटना घडली. रितेशने हॉस्टेल १५मध्ये विष पिऊन आत्महत्या केली. मित्र बाहेर गेले असताना रितेश रूममध्ये एकटाच होता. त्याचवेळी त्यानं विष प्राशन केलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.