मुंबई : द स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी), विशेष सुरक्षा दलाची स्थापना १९८८ मध्ये करण्यात आली. यात पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांनी ही सुरक्षा देण्यात येते.
एसपीजी कमांडोंचं ट्रेनिंग
एसपीजी कमांडोंना वर्ल्ड क्लास ट्रेनिंग असतं
यात शारीरीक क्षमता, निशाणेबाजी, संचार आणि विरोधकांच्या हालचाली टिपणे याचा समावेश आहे.
एसपीजीची सुरक्षा कुणाला?
यात पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि गांधी परिवारालाही सुरक्षा देण्यात आली आहे.
पंतप्रधान ज्या जिल्ह्यात किंवा राज्यात जातात, तेथील पोलिस दल एसपीजीला सहाय्यक म्हणून मदत करतात.
एसपीजीची हायटेक हत्यारं
सॅटेलाईट अपलिंक आणि मोबाईल जॅमर सारखी सुविधा असते.
एसपीजी कमांडोंकडे एफएनजी २ हजार असॉल्ट सारखी रायफल असते, ती ऑटोमॅटिक गन आहे.
ग्लोक १७ नावाची अत्याधुनिक पिस्तुलंही त्यांच्याकडे असतं.
एसपीजीचं काम कसं चालतं
एसपीजी कमांडो चार वेगवेगळ्यास्वरूपात काम करतात
१) ऑपरेशन्स
२) ट्रेनिंग
३) गोपनीय कामं आणि प्रवास, दौरे
४) प्रशासन