इंद्राणी-पीटरचे ९०० कोटी सिंगापूरच्या बँकेत

शीना बोरा हत्याप्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जीच्या कंपन्यांमधून जवळपास ९०० कोटी रुपये सिंगापूरमधील एचएसबीसी बॅंकेत ट्रान्सफर करण्यात आलेत. 

Updated: Nov 26, 2015, 09:09 PM IST
इंद्राणी-पीटरचे ९०० कोटी सिंगापूरच्या बँकेत title=

मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जीच्या कंपन्यांमधून जवळपास ९०० कोटी रुपये सिंगापूरमधील एचएसबीसी बॅंकेत ट्रान्सफर करण्यात आलेत. 

इंद्राणीनं तिची मैत्रीण गायत्री आहुजाच्या माध्यमातून शीनाच्या नावे हे खाते उघडले गेले आहे, अशी माहिती सीबीआयने न्यायालयात दिली.

एवढंच नव्हे तर पीटर मुखर्जीच्या अनेक कंपन्यांमध्ये राजकीय नेत्यांचाही पैसा असल्याचं समजतंय. कारण पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी या दोघांची नाईन एक्स ही कंपनी बंद केल्यानंतर, तेराशे कोटी रुपये उत्पन्नापैकी ४०० कोटी रुपयांचा हिशोब सीबीआयला मिळालाय.

मात्र उर्वरित ९०० कोटी रुपयांचा हिशोब सीबीआय शोधत आहे. त्यात या राजकीय नेत्यांचा पैसा असण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.