indrani 0

शीना बोरा हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाने नोंदवला महत्वपूर्ण जबाब

10 वर्षांपूर्वी घडलेल्या आणि 2015 मध्ये उजेडात आलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणाने चांगलीच खळबळ उडवून दिली होती. 

Jun 9, 2022, 02:21 PM IST

कसा झाला शीना बोराचा खून ?

शीना बोरा हत्याप्रकरणाचं गूढ लवकरच उकलण्याची शक्यता आहे. 

May 11, 2016, 08:42 PM IST

इंद्राणी-पीटरचे ९०० कोटी सिंगापूरच्या बँकेत

शीना बोरा हत्याप्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जीच्या कंपन्यांमधून जवळपास ९०० कोटी रुपये सिंगापूरमधील एचएसबीसी बॅंकेत ट्रान्सफर करण्यात आलेत. 

Nov 26, 2015, 09:09 PM IST

इंद्राणी मुखर्जीला डेंग्यूची लागण?

शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला डेंग्यू झाल्याची शक्यता आहे. तिची तब्येत ढासळल्याने पुन्हा एकदा तिला जे. जे. रुग्णालयात बुधवारी दाखल करण्यात आलेय. 

Oct 29, 2015, 09:59 AM IST

इंद्राणी मुखर्जी हिने आत्महत्येचा प्रयत्न केला नाही

शीना बोरा हत्या प्रकरणातील संशयीत प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नसल्याचा कबुली जबाब दिलाय. ताण, अशक्तपणा आणि रक्तातील साखरेचे प्रमाण घटल्याने इंद्राणीला ग्लानी आली होती. त्यात ती बेशुद्ध पडल्याची माहिती पुढे आली आहे. 

Oct 10, 2015, 09:29 PM IST

गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे इंद्राणी बेशुद्ध नाही : रिपोर्ट, प्रकृती चिंताजनक

शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने अती गोळ्या सेवन केले नसल्याचे  फॉरेन्सिक लॅबच्या तपासणीनंतर पुढे आले आहे. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, इंद्राणीला हॉस्पीटलमध्ये जाऊन भेटण्याची  वकिलांची मागणी विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळून लावली आहे. 

Oct 3, 2015, 08:12 PM IST

इंद्राणीला ब्लॅकमेल करायची शीना, त्यामुळे गळा घोटून केली हत्या : रिपोर्ट

शीना बोरा हत्याकांडप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय. एका मीडियाचा रिपोर्टनुसार शीना बोरा आपली आई इंद्राणी मुखर्जी हिला ब्लॅकमेल करायची. त्यामुळे  इंद्राणी नाराज होती. यातूनच तिने शीना हत्या गळा आवळून केली. रिपोर्टनुसार शीनाने बांद्रा येथे थ्री-बीएचके फ्लॅटची मागणी करत इंद्राणीला ब्लॅकमेल करीत होती.

Sep 13, 2015, 10:26 AM IST

इंद्राणीला घेऊन जाणाऱ्या पोलिसांचं 'हिट अॅण्ड रन'

इंद्राणीला घेऊन जाणाऱ्या पोलिसांचं 'हिट अॅण्ड रन'

Sep 2, 2015, 02:42 PM IST

मारियासाहेब वाचा, इंद्राणीला घेऊन जाणाऱ्या पोलिसांचं 'हिट अॅण्ड रन'

पोलिसांनी माणुसकी आहे, पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या, अशा आशयाची जाहिरात किंवा विश्वास पोलिस दलाकडून वेळोवेळी दिला जातो.

Sep 2, 2015, 01:16 PM IST

शीना हत्या प्रकरण: कार सापडली, तीनही आरोपींना घटनास्थळी नेणार पोलीस

शीना बोरा गूढ हत्या प्रकरणात पोलिसांना शनिवारी त्या कारचा शोध लागला, ज्यात शीनाची हत्या केली गेली. तर दुसरीकडे रायगड पोलिसांनी तीन वर्षांपूर्वी शीनाच्या अवशेषांवरून हत्या किंवा अपघाताचा गुन्हा का दाखल केला नाही, हा प्रश्न निर्माण झालाय. 

Aug 30, 2015, 10:48 AM IST

शीना बोराचा भाऊ मिखाईल स्वतःच अडचणीत

शीना बोराचा सख्खा भाऊ मिखाईल आपल्या बहिणीला न्याय मिळवून देण्याची भाषा करता करता स्वतःच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानं दिलेल्या जबाबामध्ये अनेक बाबी या परस्परविसंगत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याचा पुन्हा एकदा जबाब घेतला जाणार आहे.

Aug 29, 2015, 10:06 PM IST

शीना बोरा हत्याकांड प्रकरणाला अनेक पैलू, आतापर्यंत काय घडलंय ?

शीना बोराचा सख्खा भाऊ मिखाईलला मुंबईमध्ये दाखल झालाय. त्याच्याकडे ४ फोटो, काही कागदपत्रं, एक ऑडिओ क्लिप आहे. या पुराव्यांच्या आधारे आणि त्याचा जबाब घेतल्यानंतर पुन्हा इंद्राणीची चौकशी केली जाणार आहे. तसंच मिखाईलनंतर पोलिसांनी पीटरनाही पाचारण केलंय. खार पोलीस स्टेशनमध्ये आजच पीटर यांचीही पुन्हा चौकशी केली जाणार आहे. मात्र, आतापर्यंत या प्रकणात काय घडलंय, त्याचा हा वेध. शीना बोरा हत्याकांड प्रकरणाला अनेक पैलू आहेत.

Aug 28, 2015, 04:43 PM IST