अखेर इंद्राणी शुद्धीवर, पण बेशुद्धीचं गूढ कायम!

शीना बोरा खून प्रकरणातील गेले तीन दिवस बेशुद्ध असलेली मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी रविवारी शुद्धीवर आली. तसंच ती कोठडीत बेशुद्ध होण्यास तणावमुक्तीसाठीच्या औषधांचा ओव्हरडोस कारणीभूत असल्याचं आधीचं आपलं ठाम विधान जे.जे.हॉस्पिटलचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांनी मागं घेतल्यानं तुरुंगाधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडलाय. 

Updated: Oct 5, 2015, 10:06 AM IST
अखेर इंद्राणी शुद्धीवर, पण बेशुद्धीचं गूढ कायम! title=

मुंबई: शीना बोरा खून प्रकरणातील गेले तीन दिवस बेशुद्ध असलेली मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी रविवारी शुद्धीवर आली. तसंच ती कोठडीत बेशुद्ध होण्यास तणावमुक्तीसाठीच्या औषधांचा ओव्हरडोस कारणीभूत असल्याचं आधीचं आपलं ठाम विधान जे.जे.हॉस्पिटलचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांनी मागं घेतल्यानं तुरुंगाधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडलाय. 

आणखी वाचा - गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे इंद्राणी बेशुद्ध नाही : रिपोर्ट, प्रकृती चिंताजनक

जे.जे. हॉस्पिटलनं पाठविलेल्या इंद्राणीच्या तीनपैकी एकाही नमुन्यात लहाने म्हणतात तशा प्रकारच्या कोणत्याही औषधाचा लवलेशही आढळला नाही. आता जे. जे. इस्पितळाने भूमिका बदलल्यानं इंद्राणी शुक्रवारी सकाळी ६ वाजता बेशुद्ध होऊन कोठडीत कोसळ्यावरही तुरुंगातील डॉक्टरांनी तिला सकाळी ११ पर्यंत जे. जे. इस्पितळात का दाखल केलं नाही, ही आमच्या चौकशीची मुख्य दिशा असेल असं तुरुंग प्रशसनातील सूत्रांनी सांगितलं.

शुक्रवारी इंद्राणी पहाटे ५ वाजता उठली आणि ती गीता वाचू लागली. त्यावेळी तिनं भोवळ येत असल्याची तक्रार केली होती. त्यावेळी तुरुंगात असलेले निवासी डॉक्टर्स केळणीकर आणि खान यांनी तिला तपासलं. तिची प्रकृती खूपच बिघडल्यानंतर मानद डॉक्टर वकार शेख यांना बोलावण्यात आलं. भायखळा तुरुंगात इंद्राणीला ठेवल्यानंतर लगेचच तिनं निद्रानाश आणि भोवळ येत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर जे. जे. हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागाच्या व्हिजिटिंग डॉक्टर सारिका दक्षीकर यांनी तिच्यावर झोपेच्या आणि अँटी डिप्रेशनच्या गोळ्यांचा उपचार केला होता.

आणखी वाचा - इंद्राणीची प्रकृती अद्याप गंभीर; महाराष्ट्र सरकारनं दिले चौकशीचे आदेश

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.