मुंबई : आयएनएस बेतवा या युद्धनौकेला अपघात झाला आहे. मुंबईजवळ समुद्रात या नौकेला अपघात झाला. ही युद्धनौका नेव्हल डॉकयार्डमधून समुद्रात उतरवली जात होती, तेव्हा हा अपघात झाला.
हा अपघात दुपारी १ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास झाला. नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी के शर्मा यांनी, तांत्रिक कारणांमुळे 'आयएनएस बेतवा'ला अपघात झाल्याचं म्हटलं आहे. अपघातामुळे 'आयएनएस बेतवा'चं किती नुकसान झालं आहे, हे तपासण्याचे आणि दुरुस्तीचे काम सुरु आहे.
ही युद्धनौका २००४ मध्ये नौदलात ही युद्धनौका सहभागी झाली होती. बेतवा नदीवरुन या युद्धनौकेला नाव देण्यात आलं आहे. ब्रह्मपुत्रा हे क्षेपणास्त्र असलेल्या आयएनएस बेतवाचं वजन ३ हजार ८०० टन आहे.