आयएनएस बेतवा उलटली, दोन नौसैनिक ठार

भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस बेतवा मुंबईतल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये उलटली. या अपघातात 2 नौसैनिक ठार तर 15 जण जखमी झालेत. यातल्या एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

Updated: Dec 5, 2016, 08:29 PM IST
आयएनएस बेतवा उलटली, दोन नौसैनिक ठार  title=

मुंबई : भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस बेतवा मुंबईतल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये उलटली. या अपघातात 2 नौसैनिक ठार तर 15 जण जखमी झालेत. यातल्या एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

दुरुस्तीसाठी असलेल्या डॉकमधून बाहेर पडत असताना ब्लॉक्स मेकॅनिझममध्ये बिघाड झाल्यामुळे अचानक नौका तिरकी झाली. यात बंदरातल्या बंधाऱ्यावर आदळून तिचा मुख्य मास्ट तुटला. बेतवा नदीचं नाव दिलेली ही युद्धनौका गेल्या 12 वर्षांपासून नौदलाच्या सेवेत आहे.

126 मीटर लांबीची आणि 3 हजार 850 टन वजनाची ही युद्धनौका उरण नौकाविरोधी क्षेपणास्त्र, बराक वन सरफेस टू एअर मिसाईल यांनी सज्ज आहे.