मुंबई : सिंचन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
कोकणातल्या सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत या दोघांची चौकशी करण्याची परवानगी एसीबीनं गृहमंत्रालयाकडे मागितली आहे.
गृहमंत्रालयानं ही फाईल मुख्य सचिवांकडे पाठवली असून सचिवांनी मंजुरी दिल्यास या दोघांची चौकशी होऊ शकेल. ऐन निवडणुकीच्या तोंडावर चौकशी झाल्यास या राष्ट्रवादीसाठी अडचणीचं ठरू शकतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.