मुंबईत आयएसआय एजंटला अटक

रेकी आणि हेरगिरी करण्यासाठी पैसे देणाऱ्या आयएसआय एजंटला मुंबईतून एटीएसने अटक केली आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 3, 2017, 11:41 PM IST
मुंबईत आयएसआय एजंटला अटक title=

मुंबई : रेकी आणि हेरगिरी करण्यासाठी पैसे देणाऱ्या आयएसआय एजंटला मुंबईतून एटीएसने अटक केली आहे. 

आयएसआय एजंट अफताब अली याच्यासाठी पैसे देवून हेरगिरी करणा-या एका व्यक्तीला एटीएसने अटक केलीये. महाराष्ट्र आणि युपी एसटीएसने केलेल्या संयुक्त कारवाईत अल्ताफ कुरेशी नामक व्यक्तीला युसुफ मंजील, डॉक्टर आनंदराव मेन रोड येथून अटक करण्यात आलीये. 

अल्ताफ हा मुळचा गुजरातमधील राजकोटचा रहिवाशी असून अल्ताफ मुंबईत हवाला रॅकेट चालवायचा. आयएसआयच्या सांगण्यावरून अल्ताफने आयएसआय एजंट अफताब याच्या अकाऊंटवर पैसे जमा केले होते. तपासात अल्ताफकडे ७० लाख रुपये नवीन नोट जप्त करण्यात आलेत.