बीएमसी भ्रष्टाचाराच्या वक्तव्यावर कपीलचं स्पष्टीकरण

मी मागच्या 5 वर्षांमध्ये 15 कोटी रुपयांचा कर दिला आहे, तरीही मला मुंबई महापालिकेत 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते.

Updated: Sep 9, 2016, 07:51 PM IST
बीएमसी भ्रष्टाचाराच्या वक्तव्यावर कपीलचं स्पष्टीकरण  title=

मुंबई : मी मागच्या 5 वर्षांमध्ये 15 कोटी रुपयांचा कर दिला आहे, तरीही मला मुंबई महापालिकेत 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते. कुठे आहेत अच्छे दिन असा सवाल कपीलनं ट्विटरवरून विचारला होता. कपीलच्या या ट्विटमुळे वाद निर्माण झाला.

या वादानंतर अखेर कपील शर्मानं स्पष्टीकरण दिलं आहे. काही व्यक्तींच्या भ्रष्टाचाराबद्दल मी चिंता व्यक्त केली. भाजप, मनसे किंवा शिवसेनेवर मी आरोप केलेले नाहीत, असं ट्विट कपीलनं केलं आहे.