कोपर्डी बलात्कार |अजित पवार सरकारवर कडाडले

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणी अजित पवार सरकारवर कडाडले आहेत, राजकारण नकोच, पण निदान अशा घटनांवर चर्चेतून कडक कायदा तरी करा, अशी मागणी अजित पवारांनी विधानसभेत केली.

Updated: Jul 18, 2016, 02:20 PM IST
 कोपर्डी बलात्कार |अजित पवार सरकारवर कडाडले title=

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणी अजित पवार सरकारवर कडाडले आहेत, राजकारण नकोच, पण निदान अशा घटनांवर चर्चेतून कडक कायदा तरी करा, अशी मागणी अजित पवारांनी विधानसभेत केली.

अजित पवार यांवर पुढे बोलताना म्हणाले,  या विषयावर राजकारण करण्याची आम्हाला गरज नाही, मात्र अशा घटनांवर कडक काय़दा व्हावा, यावर सभागृहात चर्चा व्हावी, चर्चेसाठी स्थगन प्रस्ताव आणण्यात यावा, अशी मागणी अजित पवार तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली, मात्र विरोधकांची स्थगन प्रस्तावाची मागणी फेटाळून लावण्यात आली.

अजित पवार यावर पुढे बोलताना म्हणाले, नवी दिल्लीमध्ये २०१३ मध्ये २३ वर्षीय मुलीवर ज्याप्रमाणे बलात्कार करुन तिला मरणासन्न अवस्थेत सोडून देण्यात आले, त्याच घटनेची आठवण कोपर्डीच्या घटनेमुळे झाल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले. सरकारने आणि विरोधी पक्षाने एकत्र येऊन अशा कठोर कायद्याची शिफारस करावी , म्हणजे गुन्हेगारांना गुन्हा करण्याआधी १० वेळा विचार करावा लागेल.
 
कोपर्डी येथे १५ वर्षाच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे राज्य हादरले आहे. त्याचेच पडसाद आज विधिमंडळाच्या कामकाजावर पडले. या प्रकरणात आतापर्यंत झालेला तपास आणि काय कारवाई करण्यात आली याबाबत मुख्यमंत्र्यांनी सविस्तर निवेदन सादर केले.