मुंबई : लालबाग उड्डाणपुलाच्या गर्डरला मोठी भेग पडल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय.
या पुलाची पहाणी करून दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत या पुलावरून वाहतूक बंद रहाणार आहे. त्यामुळे, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याची सूचना मुंबई पोलिसांनी केलीय.
#TrafficAlert #LalbaugFlyover Please use P D'mello road GD Rd (Pedder road ) Take Diversion from five gardens, Dadar TT. Use more of Freeway
— Mumbai Police (@MumbaiPolice) November 10, 2016
#TrafficAlert Joints on Lalbaug flyover have broken down since late last evening. MCGM to start the work from today. pic.twitter.com/pKeHqQsbg8
— Mumbai Police (@MumbaiPolice) November 10, 2016
लालबाग भागात मुक्ता सिनेमाजवळ पुलाच्या काही भागाला मोठी भेग पडल्यानं वाहतूक वळवण्यात आलीय. याचा फटका नागरिकांना बसू नये यासाठी मुंबई पोलिसांनी नागरिकांना पी डी'मेलो रोड, पेडर रोड, फाईव्ह गार्डन, दादर टीटी किंवा फ्री वे अशा पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सूचना नागरिकांना केलीय.
जे कुमार कंपनीने एमएमआरडीएच्या मदतीने हा पूल बांधला होता. महानगरपालिकेकडून या पुलाच्या दुरुस्तीला आज सुरूवात होईल.