www.24taas.com,झी मीडिया,मुंबई
एलबीटीविरोधात व्यापा-यांनी पुकारलेला संप मिटण्याची शक्यता आहे. आज व्यापा-यांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांच्या आश्वासनानंतर ठाण्यातल्या व्यापा-यांनी संप मागं घेतलाय. पुण्यातल्या व्यापा-यांमध्ये फूट पडलीये. त्यामुळं पुण्यातली दुकानं उघडणार आहेत. तर नाशिकमधल्या व्यापा-यांनीही संपाला स्थगिती दिलीये. मुंबईतले व्यापारी फक्त संपावर ठाम आहेत. पण मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर त्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
LBT च्या विरोधात असलेल्या पुण्याच्या व्यापा-यांमध्ये मोठी फूट पडलीय. पूना मर्चंट चेंबर या बंद मधून बाहेर पडलीय. पूना मर्चंट चेंबर ही घाऊक व्यापा-यांची पुण्यातील संघटना आहे.
LBT विरूद्ध बंद पुकारणा-या पुणे व्यापारी महासंघातील पूना मर्चंटस चेंबर ही सर्वात मोठी व्याप-यांची संघटना होती. पूना मर्चंटस चेंबर बंद मधून बाहेर पडल्याने बंद पुकारणा-या व्यापा-यांना मोठा धक्का बसलाय. होलसेल व्यापा-यांची दुकानं सुरू होणार असल्याने छोटे व्यापारी देखील बंद मधून बाहेर पाडण्याची शक्यता आहे.
*इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
*झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.