आचारसंहिता होणार लागू, उद्याची मंत्रीमंडळाची बैठक आजच बोलावली

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज बोलावण्यात आली आहे. नेहमी मंत्रिमंडळाची बैठक दर आठवड्यात मंगळवारी होते. मात्र आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठीचा निवडणूक कार्यक्रम, राज्य निवडणूक आयोग आज जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू झाल्यानंतर, महत्त्वाच्या घोषणा करणं सरकारला अशक्य होईल. त्या पार्श्वभूमीवर उद्या होणारी मंत्रिमंडळ बैठक आज बोलावण्यात आली आहे.

Updated: Jan 9, 2017, 08:31 AM IST
आचारसंहिता होणार लागू, उद्याची मंत्रीमंडळाची बैठक आजच बोलावली title=

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज बोलावण्यात आली आहे. नेहमी मंत्रिमंडळाची बैठक दर आठवड्यात मंगळवारी होते. मात्र आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठीचा निवडणूक कार्यक्रम, राज्य निवडणूक आयोग आज जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू झाल्यानंतर, महत्त्वाच्या घोषणा करणं सरकारला अशक्य होईल. त्या पार्श्वभूमीवर उद्या होणारी मंत्रिमंडळ बैठक आज बोलावण्यात आली आहे.

मिनी विधानसभा समजल्या जाणा-या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकार काय महत्त्वाचे निर्णय घेतं याकडे आता लक्ष लागलं आहे.