जूनमध्ये होणार राज्यात मंत्रिमंडळ विस्तार

जून महिन्यात राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मित्र पक्षांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. यामध्ये सदाभाऊ खोत, विनायक मेटे, महादेव जानकर यांना लाल दिवा मिळू शकतो. 

Updated: May 25, 2016, 10:44 PM IST
जूनमध्ये होणार राज्यात मंत्रिमंडळ विस्तार title=

मुंबई : जून महिन्यात राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मित्र पक्षांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. यामध्ये सदाभाऊ खोत, विनायक मेटे, महादेव जानकर यांना लाल दिवा मिळू शकतो. 

आरपीआयचे रामदास आठवले यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यात 10 मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो. भाजप दोन मंत्रीपदं राखून ठेवणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.